'ज्ञानेश्वर माऊली' संगीत-नाट्य कार्यक्रम ४ सप्टेंबर रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या �
नागपूर: ३ सप्टेंबर: महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त 'ज्ञानेश्वर माऊली' या भव्य संगीत व नाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता लक्ष्मीनगर येथील आठ रस्ता चौकातील सायंटिफिक सभागृहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन मुद्रा इवेंट्सच्या मनीषा काशीकर यांनी केले असून, नाट्य दिग्दर्शन निखिल टोंगळे आणि संगीत परिमल जोशी यांचे आहे. कार्यक्रमात अनिरुद्ध देशपांडे, लक्षयती काजळकर व मनीषा काशीकर गीते सादर करतील. संत ज्ञानेश्वर यांच्या भूमिकेत यश खेर राहणार असून नेपथ्य सुनील हमदापूरे यांचे व निरुपण आदित्य देशकर यांचे राहील.
रसिकांसाठी या कार्यक्रमात विनामूल्य प्रवेश असणार आहे. नागरिकांनी या सांस्कृतिक मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे
