200 नेत्रदात्‍यांच्‍या परिवाराचा सन्मान सोहळा 30 ऑगस्‍ट रोजी नागपूर

August 28, 2026 Admin
200 नेत्रदात्‍यांच्‍या परिवाराचा सन्मान सोहळा 30 ऑगस्‍ट रोजी नागपूर

2025-26 या कालावधीमध्‍ये विविध संस्‍थांच्‍या माध्‍यमातून नेत्रदान करून अनेकांचे आयुष्‍य प्रकाशमान करणा-या 200 नेत्रदात्‍यांच्‍या परिवाराचा सन्‍मान सोहळा रविवार, दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स सभागृह, हडस हायस्कूलजवळ, नॉर्थ अंबाझरी रोड, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त नेत्रदानासारख्या पवित्र व निःस्वार्थ कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या या सोहळ्याला झेडटीसीसी नागपूरचे अध्‍यक्ष डॉ. मनीष श्रीगीरीवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, एनएसएसएल लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक आनंद जयस्वाल यांची विशेष उपस्थिती राहील. महावितरण नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. रौशनी फाउंडेशन नागपूरच्‍यावतीने व महात्मे आय बँक व महात्मे आय हॉस्पिटल, माधव नेत्रालय अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share: